प्रा. जयश्री साळुंके-दाभाडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान …सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय कामगीरी बद्दल आयकॉनिक पिस अवार्डने डॉक्टरेट पदवी प्रदान(भारत सरकार प्रणित)… हा आहे 59 वा सर्वोच्च सन्मान …
अमळनेर: येथील सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे यांना आयकॉनिक पिस अवार्डने डॉक्टरेट पदवी प्रदान(भारत सरकार प्रणित) केली आहे. दि 20 जुलै 2024 रोजी दिल्ली येथील सासंद भवनात भव्य सोहळ्यात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
या संदर्भात प्रा जयश्री दाभाडे यांचे नॉमिनेशन मागविण्यात आले होते. देशभरातील खऱ्या अर्थाने तळा गाळातील घटकांसाठी कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. प्रा दाभाडे ह्या सातत्याने वंचित, दलित,आदिवासी, महिला,बालक यांच्या साठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्याच बरोबर पत्रकारिता क्षेत्रात अत्यन्त कमी वेळात आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी ठसा उमटवला आहे.अनेक आंदोलने,उपोषण, अर्ज, निवेदने या मार्फत समाजातील अति सामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी प्रशासनाकडून न्याय मिळविला आहे.वेळ प्रसंगी समाजासाठी तुरुंगवास पत्करण्याची देखील त्यांनी तयारी दाखवली आहे. प्रत्यक्ष फिल्ड वर उतरून कार्य करणाऱ्या प्रा.दाभाडे यांनी गेल्या 27 वर्षांपासून निस्वार्थीपणे आपले कार्य सुरू ठेवले आहे. आपला वेळ,पैसा,बुद्धिमत्ता इ समाज,वंचित घटकांसाठी त्यांनी दिला आहे. या सर्व कार्याची दखल आता पर्यंत अनेक अशासकीय,शासकीय पातळीवर घेण्यात आली असून आतापर्यंत 58 पुरस्कार प्रा.दाभाडे यांना प्राप्त झाले आहेत.आता हा 59 वा मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात देश पातळीवर दखल घेऊन मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.
स्क्रूटिनी समिती मार्फत सर्व माहिती तपासून पाहिल्यानंतर आलेल्या नॉमिनेशन मधून वर्गीकरण करून राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा केला जातो. या कार्यक्रमात श्री विजय संप्ला केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय विभाग, श्री नरेश बन्सल संसद सदस्य राज्य सभा, श्री सचिन गुप्ता IPS RAW गृह मंत्रालय, भारत सरकार , आचार्य श्री येशी फुंतसोक, सल्लागार, इंडो तिबेट फ्रेंडशिप असोसियेशन, तिबेट ई मान्यवरांच्या उपस्थितीत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे.
प्रा जयश्री दाभाडे यांना जाहीर झालेल्या मानद डॉक्टरेट पदवी मुळे निश्चितच अमळनेर करांची देखील मान उंचावली असून अमळनेर चे नाव देश पातळीवर गेले आहे.प्रा दाभाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून राजकीय,सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
प्रतिक्रिया…
मानद डॉक्टरेट पदवी ही आतापर्यंतच्या सर्व पुरस्कारांच्या तुलनेत सर्वात मोठा सन्मान आहे.मला मिळालेला हा देश पातळीवरील मानद डॉक्टरेट पदवी ही निश्चितच अभिमानास्पद आहे. देश पातळीवरील मानद डॉक्टरेट पदवी मिळणे आणि ती देखिल सामाजिक क्षेत्रातील आणि पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मिळणे ही खूप अभिमानाची बाब आहे. माझे आदर्श महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवीत आहे.सामाजिक क्षेत्रात काम करतांना घेतलेले कष्ट आणि मेहनत मला आज खऱ्या अर्थाने कळत आहे.अश्या महान सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व्यक्तींच्या पाऊला वर पाऊल ठेवून चालणे हे आजच्या कलियुगात अत्यंत कठीण आहे.पण फक्त प्रामाणिक पणा आणि कामाची निस्वार्थ जिद्द या जोरावर ही वाटचाल यशस्वी पणे सुरू आहे.
सतत कार्य सुरू आहे. गेल्या अनेक वर्षात मी माझ्या कार्यात उसंत घेतली नाही. पुरस्कारांनी जबाबदारी वाढते.अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते.अर्थातच काम करत असताना अनेक अडचणी येतात पण पुन्हा अश्या पुरस्कारांमुळे नव्याने उत्साह निर्माण होतो. अमळनेर करांनी मला खूप प्रेम व सहकार्य दिले आहे.त्यामुळे मी कार्य करू शकते असेच सहकार्य असू द्यावे.
प्रा डॉ जयश्री साळुंके -दाभाडे