निर्णय झालाय सक्त,,,, आता अनिल दादाच फक्त,,,

निर्णय झालाय सक्त,,,, आता अनिल दादाच फक्त,,, असं म्हटलं जातं की कोणी कोठे व केव्हा जन्माला यावं हे आपल्या हातात नसत! पण काही कर्तृत्ववान व्यक्ती अशा असतात की त्या भलेही कोणत्याही कुटुंबात समाजात जन्माला आल्या तरी त्यांचा ठसा उमटवतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाची व कर्तृत्वाची दखल समाजाला व ते ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना घ्यायला भाग पडतात. अगदी थोड्या कालावधीत ज्यांनी हे सिद्ध करून दाखविला ते म्हणजे आपले अनिल दादा..! सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे युवकांचे मार्गदर्शक, कार्यकर्त्यांच्या आधारस्तंभ एक दिलदार रसिक मित्र आणि दूरदृष्टी असलेले भूमिपुत्र आमदार..! दादासाहेब आज तुमचा वाढदिवस..! वाढदिवस म्हणजे आयुष्याच्या आनंद यात्रेतील महत्वपूर्ण वळण,,,,!

“दुवा है कि खुश रहो तुम,,
मिले ना कोई गम, जहा भी रहो तुम,
समुंदर की तरह दिल है गहरा तुम्हारा,
खुशियों से भरा रहे सदा दामन तुम्हारा !
दादासाहेब आपण अमळनेर मतदारसंघात धाडसाच्या नव विचारांची व विकासाच्या राजकारणाची सुरवात केली. एकूणच मतदारसंघाच्या राजकारणाची जी दशा होती त्याची दिशा बदलण्याचे सकारात्मक श्रेय जनता आपणास देते.
आपण 2019 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्या कामाची व अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप पक्षकार्यात पाडली, त्याची पक्षाने नोंद घेऊन अवघ्या काही कालावधीतच आदरणीय पक्षप्रमुख दादासाहेब श्री अजित दादा पवार यांनी तुमच्या मजबूत व विश्वास खांद्यावर “प्रतोद” पदाची जबाबदारी सोपवली. यात भर म्हणून दुग्ध शर्करा योग जुळून आला तो 2 जुलै 2023 ला मंत्रीपदाच्या रूपाने. मंत्रीपदाच्या रूपाने हा गौरव होता अनिल दादांचा, मतदारसंघाचा, कार्यकर्त्यांचा. अजित दादांनी योग्य व्यक्तीची निवड करून व अमळनेर तालुक्याला पहिल्यांदा मंत्री पद देऊन विकासाची गंगाच जणू मतदार संघाच्या दारापर्यंत पोहोचवली.
कार्यकर्त्यात रमणारा, कार्यकर्त्यांसाठी उभा राहणारा व त्यांना उभा करणारा नेता म्हणून तुमची ओळख निर्माण झाली आहे. दादा तुमची कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ अत्यंत घट्ट अशी आहे, असं म्हणतात की काही नात्यांना नाव नसते, तर काही नाती नावापुरताच असतात पण तुमच्या आणि कार्यकर्त्यांच्या नात्यात नाव आहे विश्वासाचं. तुम्ही अनेकदा कार्यकर्त्यांचा ऋण व्यक्त करताना म्हणतात की “मुझे आपके दिल मे यु उम्र कैद मिले, थक जाये सारे वकील, फिर भी जमानात ना मिले! दादा कार्यकर्त्यांसोबतच आपणास मोलाचे कौटुंबिक व राजकीय सहकार्य नेहमी मिळते ते पत्नी सौ जयश्रीताई (माजी नगराध्यक्ष) तसेच श्रीमती राजश्रीताई (लोकनियुक्त सरपंच हिंगोणे ग्रा प) व मातोश्री श्रीमती पुष्पाताई यांचे. व्यवसाय, राजकारण व कुटुंब यांची उत्तम सांगड घालून यश मिळवणार आपल कुटुंब आहे. कुटुंबातील उत्तम संवाद सतत असल्याने कुटुंबाचे आरोग्य देखील छान टिकून आहे. आपण आमदार व नंतर मंत्री झाल्यापासून आपण एकाच गोष्टीने झपाटला आहात ती म्हणजे पाडळसरे धरण, गेल्या अनेक वर्षापासून निधी आभावी रखडलेल्या या प्रकल्पाला आपण नवसंजीवनी दिली. धरणपूर्ण होणार याची खात्री व विश्वास दिला आपण व त्यासाठी लागणारे अतोनात प्रयत्न देखील केलेत आपण, त्यावरून तालुक्याला विश्वास मिळालाय धरण आता नक्की पूर्ण होणार!
धरणाच्या कामाची सुप्रमा तर आपण मिळवलीच आणि काही दिवसांपूर्वी केंद्रीय जल आयोगाची मान्यता देखील प्राप्त केली. मागील आठवड्यात तर केंद्र सरकारच्या कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होते व काही दिवसात निश्चितरित्या समावेश होणार अशी ग्वाही आपण दिलीत, आपल्या कार्यकाळात आपण धरणासाठी एकूण 525 कोटी निधी मिळवून दिला, त्या बद्दल आपले शतशः आभार.,,,, दादासाहेब धरणाच्या प्रस्तंभाचे काम सात मीटर पर्यंत झाले. गरडरचे देखील काम पूर्ण झाले, यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार अजित दादांचे मोलाचे सहकार्य आपणास लाभले.श्री अजित दादांच्या देखील ऋणात शेतकरी व नागरिक राहु इच्छितात! धरण आपणाकडूनच पूर्ण होईल याची खात्री सगळ्यांना आहे. त्यासाठी आमचे कर्तव्य म्हणून आम्ही आपल्या पाठीशी आहोत व आपणच आमचे भावी आमदार आहात!
दादासाहेब तुमच्या सर्व स्वप्नपूर्तीसाठी राजकीय प्रवासासाठी निरोगी व आनंदी आयुष्यासाठी मतदार संघाच्या वतीने आभाळभर शुभेच्छा!
आपण आपल्या कार्यकाळात अत्यंत आवश्यक व दुर्लक्षित असे कामे करून मतदारसंघाला व नागरिकांना त्रास मुक्त, समस्यामुक्त (प्रत्येक क्षेत्रात) करण्याचा अहोरात्र प्रयत्न करून पुढील कामे मंजूर करून कार्यान्वित केलीत तर काही पूर्णत्वाकडे आहेत, त्याची यादी त्यांनी गरजेचे आहे.
1) शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेक वर्षापासून प्रलंबित व क्लिष्ट अशा शहरातील प्राचीन दगडी दरवाजाच्या बळकटीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी 30 लाख रुपये दिलेत. 2)शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शेत रस्त्यांसाठी तब्बल 15 कोटींचा निधी मिळवून दिला 3)शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच छताखाली येण्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर केलेत.तसेच तहसील व प्रांत कार्यालयाच्या दुरुस्ती साठी 12 कोटी रु मिळवून दिलेत
4)बोरी,पांझरा,चिखली या नद्या तसेच इतर लहान मोठ्या नाल्यांवर तब्बल 55 कोटींची साठवण बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली.
5) शहरातील धुळे रोड परिसरात अभ्यासिकेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला.
6) शहरातील चोपडा रोड व बेटावर रस्त्याला प्रत्येकी 50 लाख रुपये निधी दिला (प्रवेशद्वारासाठी)
7) शहरातील डीपी रस्त्यांसाठी 70 कोटी रुपयांचा निधी दिला.
8) मतदार संघातील नऊ गावांना बौद्ध विहारासाठी एकूण एक कोटी 55 लाख रुपये (काम प्रगतीपथावर) 9)अंमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी सुमारे सात कोटी बत्तीस लाख रुपये प्रदान केले ( काम प्रगतीपथावर)
10) पर्यटन विकासाअंतर्गत बहादरपूर येथील बद्रीनारायण मंदिरासाठी चार कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला.
11)शहरातील चोपडा रोडवरील अत्यंत परिचित व दुर्लक्षित ताडे नाल्याच्या दुरुस्तीसाठी व विकासासाठी पाच कोटी मंजूर केलेत.
12) मतदार संघातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपये दिलेत. 13)ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी 35 कोटींचा निधी दिला. 14) अमळनेर न प हद्दीतील विकास कामांसाठी 55 कोटी रुपये
15) मतदार संघातील मागासवर्गीयांसाठी सात कोटी तीस लाख रुपये 16)अंमळनेर मतदार संघातील प्रथम आमदार ज्यांनी दिव्यांगांसाठी आमदार निधीतून 20 लाख रुपयांचे साहित्य वाटप केले 17)दुर्बल घटकांतील महिलांसाठी संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना व इतर योजना मार्फत शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न.
वरील कामावरून लक्षात येते की मतदार संघाचा विकास करताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न दादांचा होता शेवटी दादांचे एकच लक्ष पाडळसरे धरण पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बांधापर्यंत पाणी पोहोचविणे खूप खूप शुभेच्छा दादासाहेब!

शरद सोनवणे
अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]