राष्ट्रवादी किंवा अजितदादांना सोडून जाण्याचा प्रश्नच नाही

वैफल्यग्रस्त झाल्याने डॉ.सतीश पाटलांकडून चुकीचे विधान,मंत्री अनिल पाटील यांचा खुलासा

अमळनेर: मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजितदादा पवार यांना सोडून जाण्याचा प्रश्नच असून सख्ख्या पुतण्याला पारोळा व एरंडोल मतदारसंघात मताधिक्य मिळवू न शकल्याने वैफल्यग्रस्त झालेले माजी मंत्री डॉ.सतीश पाटील या पद्धतीचे चुकीचे विधान करीत असल्याचा खुलासा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे की राजकीय झोपेत असलेल्या सतीश पाटलांना आता वेगवेगळी स्वप्ने पडू लागली आहे.मी अजित दादांना सोडून दुसऱ्या पक्षात जाणार हे देखील त्यांना स्वप्नच पडले असावे,लोकसभा निवडणुकीत पुतण्याला निवडून आणू शकले नाहीत एवढेच नव्हे तर आपल्या स्वतःच्या मतदारसंघात मताधिक्य मिळवून देऊ न शकल्याने त्यांना वैफल्य येणे साहजिकच आहे,त्यामुळेच काहीतरी राजकीय झोपेमध्ये बडबड त्यांची सुरू झाली आहे.यामुळे माझ्या दृष्टीने त्यांना फारसे काही महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.खरेतर त्यांनाच कंटाळून पक्षातून आ. एकनाथराव खडसे यांच्या सारखी मंडळी बाहेर पडली, माजी मंत्री गुलाबराब देवकर यांना सतत विरोध,रविंद्र भैय्यांना विरोध,ज्या दिवसापासून ते आमदार व मंत्री झालेत तेव्हापासूनच खरेतर या जिल्ह्यात पक्ष डबघाईला जाण्यास सुरुवात झाल्याने या स्थितीला तेच जवाबदार आहेत.राजकीय झोपेत बदबडणाऱ्या व्यक्तीवर जनता कधीही विश्वास ठेवत नसते.नामदार अजितदादा माझे श्रद्धास्थान असून ज्यांनी ज्या व्यक्तीची कुठलीही राजकिय पार्श्वभूमी नाही त्याला थेट राज्य मंत्री मंडळात स्थान दिले,त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.आणि यापुढे अमळनेर मतदारसंघात विधानसभेची निवडणूक मी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँगेस पार्टीतर्फेच मी लढविणार असून यात माझ्या राजकीय कारकिर्दीपर्यंत कोणताही बदल होणार नाही असा ठाम विश्वास देखील मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]