महिलांना सुवर्णसंधी
अमळनेर: प्रगणे डांगरी व तालुक्यातील इतर गावातील महिलांना जाहीर नम्र विनंती वजा सूचना.
मुख्यमंत्री ….माझी लाडकी बहीण. . अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15..7..2024. आहे
सर्व महिला भगिनींना कळविण्यात येते की कालच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री …..माझी लाडकी बहीण…. ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतील प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये प्रति महिना मिळणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका.. ग्रामसेवक…. सेतू सुविधा केंद्र यांचे मार्फत विनामूल्य अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्र लागणार आहेत. कागदपत्र अगदी सोपी आहेत.
1…. कुटुंबाचे रेशन कार्ड.
2…… आधार कार्ड.
3….. रहिवासी दाखला.
4….. जन्म दाखला
5….. अडीच लाखाच्या आत उत्पन्न असलेला तहसीलदार यांचा कुटुंब प्रमुखाच्या नावाने उत्पन्नाचा दाखला.
6…. बँक खाते पुस्तक.
7…. पासपोर्ट फोटो.
8…. हमी पत्र.
वरील प्रमाणे कागदपत्र लागणार असून त्याची पूर्तता ग्रामसेवक. अंगणवाडी सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र यांचे मार्फतऑनलाईन करावी.
अर्ज करण्याची शेवटची मुदत 15 जुलै 2024 असून. त्यानंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे 21 ते 60 वयोगटातील सर्व महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही नम्र विनंती. अर्ज करण्यासंदर्भात काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा
मोबाईल नंबर 9011917644
आपला नम्र
अनिल आबा शिसोदे
प्रगणे डांगरी.
अमळनेर.