लोकशाहीत आपोआप काहीच घडत नसते. राजकारण बदलत असते सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन

अमळनेर:  नुकत्याच झालेली लोकसभा निवडणुक आणि पुढे येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रागतिक समविचारी संघटना उत्तर महाराष्ट्र मेळावा, बैठक 23 जून 2024 रोजी सकाळी दहा वाजता साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथे पार पडला त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी विचार मांडताना सांगितले की भविष्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत राजकारण हे बदलत असते लोकशाहीत आपोआप काहीच घडून येत नाही .पुढे विचार मांडताना सांगितले की आपण सर्वांनी जीव तोडून काम केले पाहिजे आणि अमळनेर मध्ये एक नवीन चेहऱ्याला संधी दिली गेली पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या क्षेत्रातील ऊर्जा टिकवली पाहिजे आणि वर्धा येथील होऊ घातलेल्या 8 आणि 9 जुलै 2024 रोजी भारत जोडो अभिमान अंतर्गत देशपातळीवरील कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी होऊन पक्षाची मांडणी अजून कशाप्रकारे चांगली करता येईल हे विचार सोबत घेऊन आपल्या मतदारसंघात एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन आपण मोठ बांधली पाहिजे आणि पुढच्या काळात लोकसभे प्रमाणे जिंकणारी फळी निर्माण व्हावी. भविष्यात एक मोठे राज्यस्तरीय संमेलन व्हावे आणि त्यात पक्षाच्या जाहीरनामा असावा अशी मागणी पक्ष कार्यकर्त्यांची होती आणि ती मी पुढे रेटून धरेल असे त्यांनी विचार मांडले कार्यक्रमाचे आयोजन अविनाश पाटील (अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज) यांनी विचार मांडताना महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या कार्यकाल ऑक्टोबर मध्ये संपत असून पुढे होऊ घातलेल्या निवडणुका साठी आपल्याला कामाला लागले पाहिजे आपल्याला वेळ कमी असून या काळात आपण काय काय करावे, पक्ष बांधणी कशी करावी आपले विचार जनतेसमोर प्रकरणी कसे मांडता येतील याबद्दल विचार मांडले .प्रा. अशोक पवार सर यांनी भारत जोडो अभिमान च्या निर्भय बनो अभिमान माध्यमातून आम्ही लोकसभा निवडणुका आधी आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान निर्भय बनो अभिमान राबवले याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आणि त्याची गरज पुढे विधानसभेसाठी कशी आहे हे पटवून सांगितले यानंतर कार्यक्रमाचे आयोजक विधानसभेचे भावी उमेदवार संदीप घोरपडे सर सामाजिक संघटना, राजकीय संघटना बुथ, गाव, तालुका पातळी जिल्हा स्तरावर नियोजन झाले पाहिजे आणि राज्यस्तरावर भारत जोडो अभियानांतर्गत माणसांना सहभागी करून युवा, शेतकरी, महिला यांच्यासमोर आपले पक्षाचे विचार मांडले पाहिजेत असे सांगितले अमळनेर विधानसभेच्या समस्यांबाबत त्यांनी सांगितले की पाडळसरे धरण ही किती महत्त्वाचे आहे त्यामध्ये किती शेतकरी बांधव, समाज बांधव,युवा यांना रोजगार उपलब्ध होईल याविषयी मांडणी केली आणि विधासभेत वैचारिक भूमिका घेऊन मांडणी करणारे आमदार जायला हवेत लोकशाही च्या चारही स्तंभांसह पाचवा सामाजिक चळवळींचा स्तंभ जिवंत रहायला हवा असा सामान्य व्यक्ती आमदार म्हणून विधानसभेत दिसावा.अमळनेर विधानसभेला जो कलंक लागला आहे की पुन्हा- पुन्हा विकले जातात ते पुढे भविष्यात घडू नये या साठी विनंती केली की मी विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार केला असून मला तुम्ही पाच वर्षासाठी दहा रुपयात आमदार म्हणून विकत घ्या कारण काँग्रेसमध्ये माझी 32 वर्षापासून ची कारकीर्द असून माझा जनसंपर्क आणि माझ्या शाळेचे केलेलं काम, नगरपालिकेतील केलेलं काम सामाजिक काम या गोष्टींचा विचार करत असताना मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी मी पक्षाला मागणी करतो आणि महाविकास आघाडी ने याबाबत सर्वांगीण विचार करावा असे विधान केले. कार्यक्रमात सतीश भाऊ पाचोरा .जयसिंग वाघ जळगाव .सामजिक कार्रयकर्त्या दर्शनाताई पवार श्याम भाऊ पाटील, भाऊसाहेब देशमुख ,भागवत गुरुजी, रचना अडसुडे नंदुरबार, चुनीलाल भाऊ नंदुरबार, गणेश पाडवी, रंजनाताई, नितीन बागुल, मगन भाऊसाहेब. इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार मांडले .कार्यक्रमात प्रास्ताविक अविनाश पाटील यांनी केले आभार संदीप घोरपडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरावरील सामाजिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]