गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन गोशाळा -मंत्री अनिल पाटील

गोशाळेत जनकल्याण ग्रुपतर्फे 1004 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

अमळनेर: अटकाव न्यूज:  कोविड काळात अन्नछत्र, दुष्काळात चारा छावणी, टँकर द्वारा पाणीपुरवठा व 2015 पासून सुमारे 400 गोमातांचे संरक्षण व संवर्धन याबरोबरच गेल्या सहा वर्षांपासून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन बाबुलाल शहा गोशाळा, अमळनेर ही अभिनंदनास पात्र असल्याची भावना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.
तसेच हर्षा बेन सावला यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील जनकल्याण ग्रुप दरवर्षी हजार गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य साठी आर्थिक मदत करत असतात त्यांचाही आदर्श समाजाने घ्यावा असेही उद्गार मंत्री पाटील यांनी गोशाळेत 1004 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना काढले. यावेळी व्यासपीठावर जनकल्याण ग्रुप मुंबईच्या जागृती कोठारी, मोना शहा, हर्षा बेन सेठ, रश्मी शहा, सरला मामी पुरिया, निशा गोरडिया, रुहल घ थलिया ,सारिका मोदी, रघुवीर स्वीट दिलीप भाई, एम टी सी ग्रुप के संजय मेहता व भानुबेन बाबूलाल शहा गोशाळेचे सचिव चेतन शहा उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .अशोक पवार यांनी केले. सूत्रसंचालन दयाराम पाटील सर तर स्वागत गीत मेघा पाटील व विद्यार्थिनींनी म्हटले.
दरम्यान भानूबेन बाबूलाल शहा, गोशाळा, अमळनेर व युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर या संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनकल्याण ग्रुप मुंबईच्या वतीने मोनाबेन शहा यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भाषण झाले .मुंगसे , बहादरवाडी, हिंगोने बुद्रुक, नंदगाव, लाडगाव, शिरसाळे, ढेकू सिम, हिंगोने खू प्र , दहिवद खुर्द ,वाक टूकी ,खोकर पाठ ,येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना तर समता युवक कल्याण केंद्र प्राथमिक शाळा, साने गुरुजी प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय प ष्टाने , पिंपळे रोड भिल्ल वस्ती, ताडेपुरा, शनी पेठ, गोशाळा परिसर, जैन मंदिर कर्मचाऱ्यांची पाल्य, येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यास प्रत्येकी सातशे रुपये पर्यंतचे शैक्षणिक साहित्य एक हजार चार विद्यार्थ्यांना देण्यात आले. सर्व विद्यार्थी व शिक्षक, पालकांची भोजनाची व्यवस्था कार्यक्रम स्थळी करण्यात आली होती. पत्रकार बांधव देखील यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास माजी अप्पर जिल्हाधिकारी एच टी माळी ,मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष राजू महाले ,वीरेंद्र शहा, प्रकाश पारेख ,निवृत्त मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, माजी नगरसेवक श्याम पाटील, चेतन सोनार ,प्रफुल्ल सिंघवी, बिपिन कोठारी, गिरीश शहा, डॉ शहा, आदी मान्यवर उपस्थित होते ,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पाटील ,योगेश पाटील, परदेशी सर ,डी ए पाटील ,विक्रम पाटील ,वाणी सर , भारती गाला, मालती पाटील, अर्चना गिरीश वर्मा ,रोहित सोनार, उमेश सोनार, अजय शहा, अथर्व डेरे, दिलीप डेरे प्रकाश डेरे, रमेश धनगर ,मुकेश महाजन, किसन महाराज ,सलीम भाई तडवी, महेश राजपूत, मनीष राजपूत, भैय्या पवार, रमेश पावरा, रतिलाल पावरा, लालू पावरा व छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सदस्य आदींनी कठोर परिशन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]