अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार खासदार स्मिताताई वाघ यांनी दिले संघटनेला आश्वासन.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना

अमळनेर:अटकाव न्यूज: जळगांव लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांच्या जळगांव येथील निवासस्थानी सत्कार करून मागण्यांचे निवेदन सादर करत सविस्तर चर्चा केली. निवेदनात अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत तसेच सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावे. आयसीडीएस आणि एनएचएम यांच्या वार्षिक बजेट मध्ये कोणतीही कपात करू नये,अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योति तसेच प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेचे लाभ लागू करावेत. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना कामावर आधारित मोबदला न देता दरमहा ठराविक रक्कम वेतन म्हणून लागू करावी. महागाईचा विचार करून मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करावी. मा. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करावी त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दिल्या जाणाऱ्या गणवेश आणि सदिल खर्चाच्या रकमेत(स्टेशनरी) भरीव वाढ करावी. महागाईचा विचार करून अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू करावे तसेच सद्या दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात तिपटीने वाढ करावी. यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आल्या.त्यावर श्रीमती स्मिताताई यांनी अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांच्या मागण्या रास्त व योग्य आहेत. महिला खासदार म्हणून आपल्याकडून महिला कर्मचाऱ्यांची खूप अपेक्षा असल्याचे कर्मचाऱ्यांनी नमूद केले. आपल्या मागण्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर निश्चितपणे प्रयत्न करीन तसेच संबधित खात्याच्या मंत्र्याबरोबर दिल्लीत संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्याचाही प्रयत्न केला जाईल.असे सांगत शिष्टमंडळाला आश्र्वासित केले. शिष्टमंडळात रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह श्रीमती सुनंदा नेरकर,चेतना गवळी,सरला देशमुख,कल्पना जोशी,मनिषा कोठावदे,निता सुरवाडे,वंदना माळी,प्रमिला पाटील,शारदा पाटील,सुलोचना पाटील,शोभा जावरे,उज्वला पाटील,संगीता कोळी,कल्पना भोई,भागिरथी पाटील,सुनंदा पाटील,भारती नेमाडे,चंद्रकला घोलाणे,मनिषा पाटील,आक्का पगारे आदी महिला कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]