
अमळनेर अटकाव न्यूज: येथील प्रा विजय गाढे यांनी ग्रंथालय व माहिती शास्त्र विषयात पीएचडी मिळविल्याने अल्लामा फजले हक खैराबादी तर्फे करण्यात आला जाहीर सत्कार.

सविस्तर वृत्त असे की,अमळनेर येथील प्रा विजय गाढे यांनी ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी सतत सहा वर्षाच्या अथक संशोधना अंती अलिगड येथील डॉ अमजद अली व लातूर येथील डॉ गोविंद घोगरे यांच्या मार्गदर्शना खाली जेजेटी युनिव्हर्सिटी,राजस्थान मधून प्राप्त केल्याने अमळनेर येथील सामाजिक संघटना अल्लामा फजले हक खैराबादी तर्फे चालवण्यात येत असलेल्या स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररी च्या माध्यमातून मौलाना रियाज भाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात माझी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,सेवा दलाचे संदीप घोरपडे,प्राचार्य डॉ एस जे शेख,माजी नगरसेवक सलीम टोपी,अशपाक भाई,पत्रकार समाधान मैराळे,बापुराव ठाकरे,उमाकांत ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सत्कार सोहळा करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रा विजय गाढे यांना आपल्या मनोगतातून भर भरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ताहेर शेख,हाजी के बी शेख साहब, जहूर मुतवल्ली, रूकनोदिन अहलेकार, गयास अहलेकार, साबू दादा, नीतीश लोहरे, अशपाक शेख,अमजद अली शाह, जलाल शेख,खालिक शेख, ऐजाज शेख, फारूख खाटीक,रहीम मलिक,आबिद भाई बैंड वाले, अहमद अली आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार पत्रकार बापुराव ठाकरे यांनी केले.
विजय गाढे हे लोकप्रिय दैनिक देशोन्नती चे शहर प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.त्यांचा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात दाडंगा संपर्क असून एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहे.
तालुक्यातील जवळ पास सर्वच शासकीय अधिकारी,कर्मचारी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी प्रत्यक्ष वां अप्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.