प्रकाश भाई पाटील ,युवा मंच अंमळनेर तर्फे जातीचे दाखले व अत्यावश्यक दाखले मोफत काढून देण्यात येणार

अमळनेर विधानसभा क्षेत्रातील इ. 10वी व इ.12 वीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना मिळणार मोफत दाखले

अमळनेर अटकाव न्यूज: ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने शासन ,आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व जनतेला आवश्यक दाखले काढून दिले त्याच धर्तीवर आधारित श्री प्रकाश भाई पाटील ,युवा मंच अंमळनेर तर्फे सन- 2023- 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या अमळनेर विधानसभा क्षेत्रातील इ. 10वी व इ.12 वीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना जातीचा दाखला (caste certificate),उत्पन्नाचा दाखला (Income certificate), वय अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला (Age, Domicile, Nationality certificate ),नॉन -क्रिमिनल सर्टिफिकेट अशा प्रकारचे अत्यावश्यक दाखले मोफत काढून देण्यात येणार आहेत जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी काहीही अडचण ठरणार नाहीत तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विद्यार्थी- पालकांची गैरसोय थांबेल यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम अमळनेर विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पहावयास मिळणार आहे यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी सर्व मूळ कागदपत्रासह आणि त्यांच्या छायाकित प्रति सोबत आणणे गरजेचे आहे.
अ)उत्पन्नाचा दाखला त्यासाठी लागणारे कागदपत्रे-
1,) तलाठी उत्पन्नाचा दाखला भरलेला 2)आधार कार्ड
3 )रेशन कार्ड
4)एक फोटो
5)शेती असल्यास सातबारा उतारा जोडावा लागेल (मूळ )
6)अर्जदार नोकरीला असल्यास वेतन प्रमाणपत्र जोडावे
ब,)जातीचा दाखला (caste certificate)
1)उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईट
2)वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला
3)आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
4)उमेदवार कुणबी जातीचा असल्यास कुणबी पर्यंतचा पुरावा आवश्यक 5)नावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र किंवा राजपत्र असणे आवश्यक 6)वंशावळ
7)दोन फोटो
8)आधार कार्ड
9)ओटीपी साठी मोबाईल
क)वय आदिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला( एज डोमेसेल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट )
1)अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला
2)आधार कार्ड
3)रेशन कार्ड किंवा सरपंच किंवा नगरसेवक या कडील रहिवासी दाखला
4) एक फोटो
5)स्वयंघोषणापत्र
6)ओटीपी साठी मोबाईल ते अर्जदार अमळनेर तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
ड,)नॉन क्रिमिनल साठी
1)उमेदवाराचा जातीचा दाखला 2)तहसीलदार यांनी दिलेले तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
3)उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला
4)आधार कार्ड
5)एक फोटो सदर कागदपत्रे घेऊन प्रमाणपत्रासाठी दि.16जून 2024 ते 30जून 2024 दरम्यान वेळ सकाळी 10 वा ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्री प्रकाश भाई युवा मंच अमळनेर येथील संपर्क कार्यालय तळमजला शिवांश बिजनेस हब धुळे रोड अंमळनेर येथे संपर्क साधावा ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]