द्रौ.रा.कन्या शाळेत दहावीच्या विद्यार्थिनींना निरोप

अमळनेर: येथील श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत दहावीच्या म्हणजेच एसएससीच्या मुलींसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. सुरुवातीला पर्यवेक्षिका एस.पी.बाविस्कर यांनी परीक्षेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक एस.बी. निकम यांनी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन केले. समाजशास्त्र विषयाचे सुगंधा पाटील, गणित विषयाचे बी.एस. पाटील, इंग्रजी विषयाचे व्ही.जे.पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी शालेय विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात सर्व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. पर्यवेक्षक व्ही.एम. कदम, क्रीडा शिक्षक जे.व्ही. बाविस्कर,ज्येष्ठ शिक्षक एस. एस.माळी, एस.एस.वाघ डी.एन.पालवे उपस्थित होते.
दहावीच्या पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या दहा विद्यार्थीनिंचा सत्कार करण्यात आला. गाईडच्या विद्यार्थीनिंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सूत्रसंचालन पी.डी.शेवाळे यांनी तर आभार सुगंधा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]