अमळनेर: रिझर्व बॅँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय चलनातून 2000 रुपयांची नोट आता बंद केली जाणार आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजारांची नोट असेल त्यांना बँकेत जावून चलनी नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. मोदी सरकारने 8 नेव्हेंबर 2016 साली नोटाबंदीचा निर्णय घेत 500 आणि1000 रुपयांच्या चलनी नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर नव्या चलनी नोटा बाजारात आल्या होत्या. त्यामध्ये 2000 रपयांची गुलाबी रंगाची नोट चलनात आली होती. मात्र आता सात वर्षानंतर ही नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे.
सप्टेबंर 2023 पर्यंत नारिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन रिझर्व बॅँकेने केले आहे. सध्या ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते नागरिक त्यांच्याकडील नोटा कायदेशीर निविदा म्हणून वापरू शकतात.
सन 2018-19 मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती आणि त्यापैकी जवळपास 90 टक्के नोटा 2017 पूर्वी सिस्टममध्ये टाकल्या गेल्या होत्या. चलनी नोटांचे आयुष्य सर्वसाधारणपणे 5 वर्षांचे असते. त्यावेळी छापलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे आयुष्य पाच वर्षांचे होत आले आहे, त्यामुळे या नोटांचे चलन व्यवहारातून थांबेल.
रिझर्व बॅँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छापाई पूर्णपणे बंद करणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी सध्या चलनात असलेल्या नोटा लगेच व्यवहारातून बंद करण्यात येणार नाहीत. रिझर्व बॅंकेने बॅँकांना ग्राहकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देऊ नयेत असे म्हटले आहे, नागिरकांना 2 हजार रुपयांच्या नोटा बॅँकेतून बदलून घेता येणार आहेत. त्यासाठी रिझर्व बँकेने 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत नागरिक आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. मात्र एका वेळी 20 हजार रुपये किंमतीच्या म्हणजेच 10 नोटा नागरिक बदलून घेऊ शकतात.