माध्यमिक विद्यालयात अंतुर्ली-रंजाने येथे 1 मे कामगार दिनी केले ध्वजारोहन
अमळनेर: नवीन माध्यमिक विद्यालयात अंतुर्ली-रंजाने येथे मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात आली.
२००६ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन’ची औरंगाबाद येथे स्थापना झाली. राज्यातील तालुक्यांत मुलींसाठी मानव विकास निर्देशांक मिशन योजना राबवीत आहे अतिमागास तालुक्यांमध्ये इयत्ता ८ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून ५ कि.मी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन’मार्फत राबविली जात आहे.
याचा मुख्य उद्देश म्हणजे- मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे शाळा गळतीचे प्रमाण रोखणे, मुलींच्या बाल विवाहाचे प्रमाण कमी करणे यांसारख्या महत्त्वाच्या उद्देशाने महाराष्ट्र मानव विकास निर्देशांक मिशन गाव ते शाळा या दरम्यान सर्व मुलींना मोफत सायकल वाटप ची सोय उपलब्ध करून देते.याचं योजनेचा लाभ घेत अमळनेर तालुक्यातील नवीन माध्यमिक विद्यालयात अंतुर्ली-रंजाने येथे मानव विकास योजनेतंर्गत विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ताईसाहेब सौ. तिलोत्मा रविंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. सुरुवातीला मान्यवरांचे प्रमुख पाहुणे संस्थेच्या अध्यक्षा ताईसाहेब सौ तिलोत्मा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक दादासाहेब श्री सचिन बाळू पाटील, अंतुरली-रंजाणे गृप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती ताईसाहेब मंगल किशोर पाटील, तासखेडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. कल्पना सुनील पाटील, आमोदे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रजनीताई पाटील, श्री सुनील ओंकार पाटील,श्री. एस. एन. पाटील सर अंतुरली येथील पोलीस पाटील श्री सुभाष आंनदा पाटील रंजाणेचे पोलीस पाटील श्री रविंद्र प्रकाश पाटील तसेच शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब श्री पी. डी धनगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब यांनी मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच दादासाहेब श्री सचिन बाळू पाटील यांनी आपल्या मनोगतात शासनाच्या योजनेचे महत्त्व विशद केले. मान्यवरांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. बी पाटील सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. एस. ए. पाटील यांनी केले. ह्या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री. पी. डी. पाटील सर श्री बी. एन. पाटील सर श्री अजय पाटील सर श्री. जी. बी. पाटील सर सौ. एम आर पाटील मॅडम श्रीमती शैला गंगाधर बैसाणे मॅडम तसेच शाळेचे भाऊसाहेब एस. बी. पाटील श्री भगवान पाटील, श्री. संजय पाटील, श्री नानाभाऊ पाटील श्री.हितेंद्र बडगुजर श्री. भटू पाटील उपस्थित होते.
???? नवीन माध्यमिक विद्यालयात अंतुर्ली-रंजाने येथे 1 मे कामगार दिनी केले ध्वजारोहन
अमळनेर: नवीन माध्यमिक विद्यालय अंतुरली-रंजाणे विद्यालयात 1मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला ह्या प्रसंगी ध्वजारोहण विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पी. डी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले ह्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर बी पाटील सरांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. ए. पाटील यांनी केले. ह्या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी उपस्थित होते. तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.