सापडलेला मोबाईल वापस करून दाखविला प्रामाणिकपणा
अमळनेर दि ०७: प्रामाणिक माणसांना गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज भासत नाही अडथळे किती असो काट्यांचे व चिखलांचे बहर त्यांच्या नशिबी कायम असतो आणि आचरणात आणलेले सदगुण नेहमीच त्यांची चमक स्पष्ट करतात असेच एक उदाहरण म्हणजे बंटी भावसार व गिरीष चौधरी यांचा प्रामाणिकपणा . ( व्यवसाय पेंटर काम )
आज दि ०७/०४/२०२३ रोजी सकाळी सौ.प्रतीक्षा बडगुजर रा.वड चौक अमळनेर ह्या मुलाची प्रकृती बरी नसलेमुळे डॉ. विशाल बडगुजर यांच्या रुग्णालयात गेले असता त्याचा मोबाईल पिशवी फाटल्यामुळे पिशवीतून श्री स्वामी समर्थ केंद्रा जवळ पडला असता सदर मोबाईल बंटी प्रल्हाद भावसार राहणार रामेश्वर नगर व गिरीष मधुकर चौधरी राहणार पिंपळे रोड अमळनेर हे पेंटर काम करणाऱ्या मुलांना सापडला असता त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत मोबाईल मधून नंबर शोधून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सौ बडगुजर मॅडम यांना त्यांचा मोबाईल वापस करून प्रामाणिकता दाखवली म्हणून त्यांना शंभर रुपये बक्षीस देऊन त्यांचे आभार मानले व त्यांचे सर्वत्र कौतुूक केले जात आहे.