मारवड महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत देसले यांचा सत्कार

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांची नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल, महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने दि. 20 मार्च रोजी प्राचार्य डॉ. वसंत देसले सरांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. त्यानंतर इतिहास विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य सरांचा सत्कार केला.

तद्नंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी बांधवांनी प्राचार्य सरांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य डॉ वसंत देसले सरांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ स्तरावर सतत कार्य करीत राहण्याचा मनोदय व्यक्त केला.
उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

[democracy id="1"]