मारवड ता.अमळनेर: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व (कै) न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय,, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला. समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. डॉ. संदीप नेरकर ,प्रताप महाविद्यालय, अमळनेर ,अधिसभा सदस्य क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव .प्रा. डॉ .नलिनी पाटील, प्रताप महाविद्यालय ,अमळनेर. अभ्यास मंडळ सदस्य संख्याशास्त्र विभाग ,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ,जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंतराव देसले होते.
आपल्या मार्गदर्शनात प्रा. डॉ.संदीप नेरकर सर म्हणाले की, विद्यापीठाचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या शिबिराच्या माध्यमातून विविध आस्थापनाचे ज्ञान मिळवून तेथील कार्यप्रणाली समजून घेण्यास मदत झाली असून आपण इतरांनाही त्याची माहिती द्यावी जेणेकरून अशा शिबिराचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल असे सांगितले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. नलिनी पाटील म्हणाल्या की, आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात आपण नेहमीच अपडेट राहिले पाहिजे तरच आपण स्पर्धेत टिकू शकतो म्हणून अत्याधुनिक नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित होत असताना आपण प्रत्येक क्षेत्रातील जास्तीत जास्त ज्ञान मिळवित राहिले पाहिजे .आपल्या अध्यक्षीय मनोगत प्राचार्य प्राचार्य डॉ.वसंतराव देसले म्हणाले की, या सात दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान शिबिराच्या माध्यमातून आपणास खूप शिकण्यात मिळाले आपण या माहितीचा उपयोग स्वतः तर करालच पण आपण जे शिकलो त्यातून इतरांचे मार्गदर्शन करून त्याची मदत करावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.
तत्पूर्वी सुरुवातीला महाविद्यालयाच्या वतीने आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला . प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.संदीप नेरकर सर यांचा सत्कार विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय पाटील यांनी केला. प्रा. डॉ. नलिनी पाटील मॅडम यांचा सत्कार युवती सभाप्रमुख प्रा.डॉ. नंदा कंधारे मॅडम यांनी केला. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय पाटील यांनी सात दिवसाचा शिबिराचा आढावा प्रास्ताविकाच्या माध्यमातून सादर केला . शिबिरार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून आपले अनुभव यावेळी कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर पाटील यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय नाजमीन पठाण यांनी करून दिला व कोमल पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .राष्ट्रगीताने कार्यक्रमातील सांगता झाली.