अमळनेर:तालुक्यातील जानवे येथे 15 लाख रुपये निधीतुन सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी ग्रामस्थांनी जयश्री पाटील यांचा सत्कार करून सभामंडपासाठी आमदार अनिल पाटील यांनी निधी दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.सरला प्रकाश पाटील, उपसरपंच गोपाळ पाटील, ग्रा.प.सदस्य नवल पाटील, प्रकाश वाल्हे, निंबा भिल, कविता मनोज पाटील, अजबबाई सखाराम, अनिता विलास पाटील, कमलबाई न्हावी, ग्रामस्थ अमृत बाजीराव पाटील, परशुराम पाटील, प्रकाश पाटील, अधिकार पाटील, पांडुरंग पाटील, मगन पारथी, पंडीत राजेंद्र पारधी, सुमनबाई भिल व फकीर बाबा व मित्र परीवार उपस्थित होते.