आ.अनिल पाटलांच्या हस्ते केटीवेअर दुरुस्तीचाही झाला शुभारंभ
अमळनेर:विधानसभा मतदारसंघातील भिलाली ता.पारोळा येथे बोरी नदीवर मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत 1 कोटी 28 लक्ष निधीतून साठवण बंधारा आणि मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत 47लक्ष निधीतून के.टी.वेअर बंधारा दुरुस्तीचे भूमीपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा देखील आमदारांच्या हस्ते पार पडला.सदर साठवण बंधारा भिलाली ग्रामस्थांसह शेकडो एकर शेतजमीन धारकांना वरदान ठरणार आहे,याशिवाय आमदारांच्या प्रयत्नांनी केटीवेअर दुरुस्ती होत असल्याने याचाही लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.भूमीपूजन प्रसंगी आ.अनिल पाटील यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करून सत्कार केला.यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त करताना मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा मांडून पारोळा तालुक्यातील बोरी काठावरील गावांनी आपल्याला प्रचंड प्रेम दिले असल्याने या परिसरातील गावांच्या विकासाचा अजेंडा आपला कायम राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी सरपंच बाळू पाटील, मा.उपसभापती चंद्रकांत पाटील, मा.उपसभापती अशोक बापू पाटील, आरती पाटील, संजय पाटील सर, शिवाजी पाटील, बापूजी निंबा पाटील, दिपक दादा, डॉ.नाना, ग्रामसेवक आप्पा बोरसे आदी उपस्थित होते.
साडेतीन कोटींच्या कामांचे झाले भूमीपूजन
आमदारांच्या प्रयत्नांनी भिलाली येथे 2515 योजने अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण रक्कम 7 लक्ष, डी.पी.सी.अंतर्गत संरक्षण भिंत जि.प.शाळा रक्कम 13 लक्ष, 2515 अंतर्गत स्मशानभुमी व सांत्वन शेड रक्कम 15 लक्ष, मृद जलसंधारण अंतर्गत बोरी नदीवर साठवण बंधारा रक्कम 128 लक्ष, 04अंतर्गत ब्रिजकम बंधारा बांधणे रक्कम 150 लक्ष, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत
केटीवेअर दुरुस्ती भुमिपुजन व उद्घाटन रक्कम 47 लक्ष.असे एकुण 3 कोटी 60 लक्षच्या कामाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.