आज अमळनेर येथे महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार सोहळा 2023 होणार संपन्न

अमळनेर: आपणास कळविण्यात आनंद होत आहे की आज शनिवार ११ मार्च 2023 रोजी अमळनेर नगरीत प्रथमच साजरा होत आहे साप्ता. बडगुजर उवाच तर्फे आयोजित सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार सोहळा 2023
महिला दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे यावर्षी असामान्य कर्तृत्व करणाऱ्या तीन राज्यातील महिलांना व्यक्तिगत हा पुरस्कार दिला जाणार आहे .या कार्यक्रमास समाजातील महिलांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती .

कार्यक्रम दुपारी ३ वाजता वेळेवर सुरू होणार असून कार्यक्रमाची सांगता स्नेहभजनाने होणार आहे.

निमंत्रक:
मा.द शं.बडगुजर, जळगाव. ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक बडगुजर उवाच
सौ .राजश्री सुदाम बडगुजर, पुणे. सहसंपादिका
प्रा. श्री सुदाम हिम्मतराव बडगुजर, पुणे

विशेष सहकार्य:
श्री.प्रवीण बडगुजर, श्री घनश्याम मांडळकर ,अमळनेर आणि
श्री क्षत्रिय बडगुजर समाज कार्यकारणी मंडळ ,अमळनेर

कार्यक्रमाचे स्थळ क्षत्रिय बडगुजर समाज मंगल कार्यालय शिरुड नाका अमळनेर. वेळ आज शनिवार दिनांक 11 मार्च 2023 दुपारी 3:00 वाजता

[democracy id="1"]