अनाधिकृत कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सावधान.

कृषी उत्पन्न बाजार समितीतच कापूस विक्रीस आणण्याचे बाजार समितीचे आवाहन..


अमळनेर: कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे बाजार समितीच्या आवारातच कापसाच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांना अधिकृत लायसन्स देण्यात आलेले आहेत म्हणून कापूस विक्री ही कृषी उत्पन्न बाजार समितीतच करावी जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही
लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली का तोंड उघडे पडते असाच एक प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निदर्शनास आला आहे

40 किलो मागे 7 ते 8 किलो ची अफरातफर करणाऱ्या अनधिकृत व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी दिला चोप


दिनांक 26/2/2023 रोजी तालुक्यातील खोकरपाट येथे करमुडच्या व्यापाऱ्यांनी 40 किलो कापसा मागे सात ते आठ किलो ची अफरातफर करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना घडली म्हणून यावर आळा बसण्यासाठी शेतकऱ्यांनी अनधिकृत रित्या खेड्यांवर येणाऱ्या अनधिकृत व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री न करता कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे लायसन्स धारक व्यापारी मापारी यांचे कडेच आपला कापूस माल विक्री करावा व अनधिकृत रित्या कुणीही कापूस खरेदी करत असल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथील कार्यालयास तात्काळ संपर्क साधावा जेणेकरून अनाधिकृत रित्या कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर चे सहसचिव श्री सुनील जिजाबराव सोनवणे यांनी केलेले आहे