चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आमदार अनिल पाटलांचा झंझावात..

खान्देशी पुणेकरांसाठी ठरताहेत आकर्षण,अनेकांच्या निवासस्थानी दिल्या भेटी

अमळनेर: पुण्या जवळील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी अमळनेर चे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी चिंचवड मतदारसंघात ठाण मांडले आहे.
कार्यकर्त्यांच्या समवेत प्रचाराचा जोरदार झंझावात त्यांनी सुरू केला असून खास करून खान्देशी पुणेकरांसाठी अनिल पाटील विशेष आकर्षण ठरले आहेत.प्रचारादरम्यान विविध मान्यवरांच्या गाठीभेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद, महिला बैठकांचे आयोजन, कॉर्नर मीटिंग सह प्रचार दौरा असे नियोजन त्यांनी केले असून कॉर्नर बैठका व प्रचार सभेत त्यांची तोफ जोरदार गुंजत आहे.अमळनेर तालुक्यातील व मतदारसंघातील तसेच खान्देशातील असंख्य मंडळी पुणे परिसरात तसेच पिंपरी चिंचवड परिसरात स्थायिक होऊन तेथे राजकीय व उद्योग क्षेत्रात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे, याशिवाय इंजिनिअरिंग तथा उच्च शिक्षण झालेले बहुतांश तरुण तेथे स्थायिक झालेले आहेत,त्या मंडळींना आमदार अनिल पाटील आपल्या मतदारसंघात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची आवर्जून ते भेट घेत असून याशिवाय घरी आग्रह देण्याचा आग्रह ते धरत आहेत यातील अनेकांच्या घरी भेटी आमदारांनी दिल्या असून काहींनी जंगी स्वागत त्यांचे केले आहे.खान्देशवासियांचे आपल्यावरील प्रेम पाहुन आमदार पाटील देखील भारावले आहेत.
या प्रचार दौऱ्यात अनिल पाटील यांचे सोबत अमळनेर येथून गौरव पाटील, भूषण भदाणे, सचिन वाघ, मुन्ना पवार, सुनिल शिंपी, श्रीनाथ पाटील, चैतन्य संदानशिव, प्रविण देशमुख, अनिरुद्ध सिसोदे, राज पाटील आदी कार्यकर्ते असून त्यांनी आतापर्यंत नवी सांगवी,जुनी सांगवी,बीजलीनगर, वाल्हेकरवाडी,पिंपळे सौदागर,पिंपळे गुरव,काळेवाडी, थेरगाव, डांगे चौक, आकुर्डी, राहाटणी,पूर्णानगर,चिंचवड या भागात प्रचार दौरा केला आहे.विशेष करून खान्देशी मंडळींचा रहिवास असलेल्या भागात आमदार अनिल पाटील यांना प्रचाराची जवाबदारी दिली जात आहे.

प्रचार सभेत खान्देशी हिरा म्हणून झाला उल्लेख चिंचवड मतदारसंघात सुरू असलेल्या एका सभेत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांचे भाषण सुरू असताना आ अनिल पाटील यांचे याचवेळी मंचावर आगमन झाले त्यावेळी जनतेमधून खान्देशी हिरा असा अनिल पाटलांचा नामोल्लेख होऊन जयघोष झाल्याने जयंत पाटील यांनी देखील विधानसभा निवडणूकित अनिल पाटलांच्या प्रचार सभेसाठी अमळनेरात गेलो असता 50 हजाराची रेकॉर्ड ब्रेक सभा त्यावेळी झाली होती त्यामुळे खऱ्या अर्थाने खान्देशी हिरा ते असल्याचे सांगत त्यांचा गौरव केला.

[democracy id="1"]